Join us

मुसळधार पावसाचा मुंबईत भाज्यापाल्याच्या दराला फटका; भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 3:29 PM

ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक भाज्यांच्या दरामध्ये या आठवड्यात घसरण सुरू झाली आहे.

 राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याच्या विक्रीवरही झाला आहे. मुंबई बाजार समितीत ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास जवळपास ३०० टन माल शिल्लक आहे. मागणी घटल्यामुळे अनेक भाज्यांचे दरही घसरले आहेत.

मुंबईत बुधवार पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी बुधवारी भाजीपाला खरेदी केला नाही. बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासून ५३५ वाहनांमधून टन २,२२१ भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये चार लाख ९८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक भाज्यांच्या दरामध्ये या आठवड्यात घसरण सुरू झाली आहे.

फ्लॉवर २५ ते ३५ वरून १६ ते २० वर आला आहे. कोबी १५ ते २० वरून १० ते १४, शेवगा ४० ते ५० वरून ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जाआहे. कोथिंबीर १६ ते २२ वरून ८ ते १२, मेथी १५ ते २० वरून १० ते १४, पालक ८ ते १२ वरून ६ ते १०, शेपू १४ ते १८ वरून १० ते १६ रुपये जुडी झाली आहे.

पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी होती. मागणी नसल्यामुळे भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट

टॅग्स :मार्केट यार्डपाऊसमुंबई