हिंगोली येथीलबाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
नवे सोयाबीन काढणीस सुमारे महिनाभराचा अवधी आहे. सध्या जुने तसेच उन्हाळी सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. तसेच मूग आणि उडीदही येत आहे.
परंतु, आवक कमी आहे. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे ९ ते २० सप्टेंबरदरम्यान भुसार शेतमालाचे बीट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद काळात शेतकऱ्यांनी भुसार शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे बाजार समितीने कळविले आहे.