चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत.
लसूण व दोडका यांची आवक व भाव स्थिर राहिले आहेत. ओल्या भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी, ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ११,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६ हजार क्विंटलने घटल्याने भावात २०० रुपयांची वाढ झाली.
कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून २ हजार ७०० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढूनही भावात शंभर रुपयांची वाढ झाली.
बटाट्याचा कमाल भाव १ हजार ९०० रुपयांवरून २ हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक २८ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
४ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत मिरचीला भाव
चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमाल आवक व बाजारभाव
कांदा
एकूण आवक ११,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,७०० रुपये.
भाव क्रमांक २) २,२०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,५०० रुपये.
बटाटा
एकूण आवक २,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,००० रुपये.
भाव क्रमांक २) १,४०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,२०० रुपये.
अधिक वाचा: उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर