Join us

आज राज्यात गव्हाला कसा मिळतोय बाजारभाव? पणन विभागाने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 4:24 PM

राज्यात आज दुपारी ४ वाजेपर्यंत ६४०५ क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

राज्यात आज दुपारी ४ वाजेपर्यंत ६४०५ क्विंटल गव्हाची आवक होत आहे. दररोज साधारण १९ ते २० हजार क्विंटल गव्हाची आवक होत असताना मागील चार दिवसांपासून गव्हाची आवक मंदावली आहे. दरम्यान आज पुणे बाजारसमितीत शरबती गव्हाला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत लोकल गव्हाला २५०५ ते २७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, बन्सी, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे. दरम्यान, शरबती गव्हाची नागपूरमध्ये आज सर्वाधिक आवक झाली असून १००० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. तर सोलापूरमध्ये २१८९, शरबती व लोकल जातीचा २६ क्विंटल गहू बाजारपेठेत आला होता. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण २६०० ते ३१०० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बहुतांश ठिकाणी लोकल गव्हाची आवक होत असून शेतकऱ्यांना साधारण २३०० ते ३१५० रुपये भाव मिळत असून आज सर्वाधिक दर पुणे बाजारसमितीत मिळाला.

कोणत्या बाजारपेठेत आज गव्हाला काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2024
अहमदनगर---17241628652640
अहमदनगर२१८९9235024002400
अकोलालोकल334190025002300
अकोलाशरबती230280036003100
अमरावतीलोकल622245028002625
बुलढाणालोकल36210028002550
छत्रपती संभाजीनगरलोकल19228827002505
जळगावलोकल50221124012350
लातूरलोकल6215028002350
नागपूरलोकल809221325102467
नागपूरशरबती1000310035003400
परभणीलोकल30240028002500
पुणेशरबती401400060005000
सोलापूर---3260026002600
सोलापूरलोकल15300033503100
सोलापूर२१८९8297529752975
सोलापूरशरबती919257039203130
वर्धालोकल297212524252375
वाशिम---1600239027552525
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6405

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड