Join us

भात किती दिवस घरात ठेवणार? बाजारभाव कधी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:37 PM

गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २,०४० रुपये दर मिळाला होता. यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. दरवर्षीं शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो.

अलिबाग : भातपीक झोडणी झाली असून शेतकऱ्यांनी भात घरी आणले आहे. गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २,०४० रुपये दर मिळाला होता. यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. दरवर्षीं शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो. दि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची खरेदी केली जाते.

जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी स्वत: पुरते भात ठेवून उर्वरित भात विक्रीतून आर्थिक प्राप्ती मिळवत आहेत. मात्र, भात विक्री करणाऱ्या शेतकयांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन दर शासनाकडून अद्याप जाहीर झालेले नसले तरी गतवर्षीपेक्षा दरात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी नवीन दराच्या प्रतीक्षेत आहेत.

सव्वा लाख हेक्टरवर भात लागवडजिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. कुंबेरी रचून ठेवलेल्या भाताची झोडणी पूर्ण झाली असून भात घरी आणण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

कमी पावसाचा फटकायावर्षी लागवडीनंतर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने फुटवे कमी आले आहेत. त्यामुळे उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.

३१ जानेवारीपर्यंत होती विक्रीभात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ जानेवारीपर्यंत १० भात विक्री केंद्रावर विक्री झाली आहे.

भाव आणखी वाढणारगतवर्षीं सर्वसाधारण भाताला (प्रति क्विंटल) २,०४० रुपये दर मिळाला होता. दरवर्षी दरवाढ करण्यात येते, त्यामुळे यंदा भाताचा भाव नक्की वाढणार आहे. लवकरच दर जाहीर केले जाणार आहेत.

यावर्षी सुरुवातीचा पाऊस लांबल्याने भाताला अपेक्षित फुटवे न आल्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे दरवाठ अपेक्षित आहे. - शरद पाटील, शेतकरी

दरवर्षी शभर ते दोनशे रुपयाची वाढ केली जाते. यावर्षी सुरुवातीच्या कमी पावसामुळे उत्पादक धोक्यात असल्याने दरवाढ चांगली मिळावी. - शिरोमण ठाकूर, शेतकरी 

टॅग्स :भातबाजारशेतकरीराज्य सरकारसरकारपीकअलिबागशेती