Lokmat Agro >बाजारहाट > आज कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

आज कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

How much did cotton get today Know in detail maharashtra agriculture farmer | आज कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

आज कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

कापसाचा हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे.

कापसाचा हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वर्षाच्या अखेरच्या दिवशीही कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यामध्ये सात हजारांच्यापेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. त्यामुळे साठवेला कापूस अजून किती दिवस ठेवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. येणाऱ्या काळात दर वाढतील की नाही हा प्रश्न अजून शेतकऱ्यांसमोर आहे. 

दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, एचकेएच - ४ - मध्यम स्टेपल, एच -४- मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. तर केंद्र सरकारकडून ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर जाहीर झाला असतानाही आज केवळ अकोला बोरगावमंजू येथे ७ हजार १९९ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर देऊळगाव राजा येथे ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

हिमायतनगर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर ६ हजार ७०० रूपये एवढा मिळाला. या ठिकाणी किमान ६ हजार ६०० ते कमाल ६ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. दरम्यान, आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये ६ हजार ७०० ते ६ हजार ९०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाल्याचं चित्र होतं.

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/12/2023
राळेगाव---क्विंटल3450650069506800
भद्रावती---क्विंटल834683070206925
वडवणी---क्विंटल293685070556950
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल351662068256800
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल720675068256775
अकोलालोकलक्विंटल239694970206984
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल120699974007199
उमरेडलोकलक्विंटल485640069606750
देउळगाव राजालोकलक्विंटल3800650071507000
वरोरालोकलक्विंटल3051640070006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2268665070206800
हिंगणालोकलक्विंटल17645068006800
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1010665070506900
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल105660068006700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5250640072016950
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल277675070506850

Web Title: How much did cotton get today Know in detail maharashtra agriculture farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.