Join us

दिवाळीत किती मिळतोय कापूस, कांदा, सोयाबीनला दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 9:17 PM

कांद्याला २ हजार ते ४ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. 

ऐन दिवाळीमध्ये शेतकरी आपला माल मुहूर्तावर विक्री करून त्यातून मिळणारी लक्ष्मी घरी नेत असतात. तर कापूस, कांदा, सोयाबीनचे दर सध्याच्या बाजारात स्थिर असल्याचं चित्र आहे. सोयाबीनला ४ हजार ८०० रूपयांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. तर कांद्याला २ हजार ते ४ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. 

आज मुंबईत झेंडूला १० हजारांपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळाला. दसऱ्याला अनेक शेतकऱ्यांचा झेंडू वाया गेला होता. मातीमोल दराने झेंडू विकावा लागल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. त्यानंतर आता दिवाळीत झेंडूला चांगला दर मिळत असून काही बाजार समित्यामध्ये २ हजार ते ३ हजारांच्या मध्ये सरासरी दर असल्याचं चित्र आहे. बाजार समित्यात होणारी आवक किती आहे यावरून दर ठरत असतात. 

आज कापसाचे बाजारातील दर ७ हजारांवर स्थिर असून ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रूपये सरासरी दर प्रतिक्विंटल कापसाला मिळत आहे. लांब धाग्याच्या कापसाला जरी ७ हजार २० रूपये दर असला तरी त्यापेक्षा अधिक दर वाढण्याची शक्यता सध्या मावळली असून मिळेल त्या दरात शेतकऱ्यांना माल विक्री करावा लागत आहे. सोयाबीनचेही दर स्थिर असून तासगाव बाजार समितीत आज सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ७० रूपये सरासरी दर मिळाला आहे. तर भोकर बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ४ हजार ३९४ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/11/2023
समुद्रपूर---क्विंटल509700071507100
मौदा---क्विंटल260672069206820
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल620677169716871
उमरेडलोकलक्विंटल216692070707000
देउळगाव राजालोकलक्विंटल300710072007150
वरोरालोकलक्विंटल975680072007100
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल362690071737000
काटोललोकलक्विंटल23700070007000
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल975697572257100

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल1383300049114750
जळगाव---क्विंटल259425049254885
पुसद---क्विंटल210470548904800
सिल्लोड---क्विंटल120470048004800
कारंजा---क्विंटल4000455050054855
अचलपूर---क्विंटल590480049004850
मुदखेड---क्विंटल15465048004730
मानोरा---क्विंटल145475051004877
राहता---क्विंटल65460149704850
धुळेहायब्रीडक्विंटल30455047004625
नागपूरलोकलक्विंटल3568440051114933
चांदवडलोकलक्विंटल600350048804700
ताडकळसनं. १क्विंटल438455048504650
जळकोटपांढराक्विंटल1561485050254941
यवतमाळपिवळाक्विंटल151435051004725
अक्कलकोटपिवळाक्विंटल100460048904625
वर्धापिवळाक्विंटल191405049054420
भोकरपिवळाक्विंटल401400047884394
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल546465048504750
शेवगावपिवळाक्विंटल9450046504650
परतूरपिवळाक्विंटल42489049504920
देउळगाव राजापिवळाक्विंटल80400049504750
वरोरापिवळाक्विंटल1062300048954400
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल825320048104400
तासगावपिवळाक्विंटल24489051305070
मुखेडपिवळाक्विंटल267500050005000
हिमायतनगरपिवळाक्विंटल382460047004650
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल164480050504900
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1317460051705000
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळाक्विंटल1564450051605000
बुलढाणापिवळाक्विंटल446520048504500
बोरी-अरबपिवळाक्विंटल100467550304800
पांढरकवडापिवळाक्विंटल148460051404900
उमरखेडपिवळाक्विंटल470460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल330460047004650
राजूरापिवळाक्विंटल291431549954785
काटोलपिवळाक्विंटल860400050354550
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल420440050204850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल690443049504700
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल340475049004800

 

कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/11/2023
कोल्हापूर---क्विंटल3968150048003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10878250045003500
दौंड-केडगाव---क्विंटल1325250052003900
हिंगणा---क्विंटल3250040004000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल42110050003000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9275200052503550
धुळेलालक्विंटल18870542003000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल360200044004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल309150050003250
पुणेलोकलक्विंटल14795250047003600
पुणे- खडकीलोकलक्विंटल3460046004600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5250042003350
पुणे-मांजरीलोकलक्विंटल114270040003600
पुणे-मोशीलोकलक्विंटल301150030002250
मंगळवेढालोकलक्विंटल6660040003500
कामठीलोकलक्विंटल10300040003500
कल्याणनं. १क्विंटल3450050004750
नाशिकउन्हाळीक्विंटल460240048003900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल8350150044133950
भुसावळउन्हाळीक्विंटल19250035003000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डसोयाबीनकापूस