Join us

दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा सोयाबीनला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 6:17 PM

दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कांदा बाजारात आणला होता.

भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. त्यातीलच महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाजारात आणत असतात. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच बाजारभावांनी साथ न दिल्यामुळे दसरा आणि दिवाळी सण शेतकऱ्यांसाठी बेताचेच असणार आहेत. 

आज राज्यभरात सोयाबीनला किमान ३००० रूपये प्रतिक्विंटल तर कमाल ४ हजार ८२५ रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ३ हजार रूपये दर मिळाला असून याच बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ८२५ रूपये दर मिळाला. या बाजार समितीत ४ हजार ७०० रूपये सरासरी दर मिळाला. 

दरम्यान, आज उन्हाळी, लाल आणि लोकल कांद्याचीही आवक बाजारात झाली होती. जुन्नर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ३७ क्विंटल कांद्याची आवर झाली असून किमान १३०० तर कमाल ५ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. आज संगमनेर बाजार समितीत सर्वांत कमी ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर राज्यभरात कांद्याला ३ हजार ते ५ हजारांच्या आसपास दर मिळाला. 

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/10/2023
लासलगाव---क्विंटल851400047604720
लासलगाव - विंचूर---क्विंटल758300048254700
राहूरी -वांबोरी---क्विंटल107437645514500
तुळजापूर---क्विंटल1500450046004550
राहता---क्विंटल32430147514600
कोपरगावलोकलक्विंटल98400047664681
कोपरगावलोकलक्विंटल30450047014625
परांडानं. १क्विंटल4450045004500
अक्कलकोटपिवळाक्विंटल90460047504650
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल15445147904761
आंबेजोबाईपिवळाक्विंटल1200452947214650
आष्टी-जालनापिवळाक्विंटल135449048014650
वाशी (धाराशिव)पिवळाक्विंटल6430046004400

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/10/2023
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10037130053003000
लासलगावलालक्विंटल56100835122151
कोपरगावलालक्विंटल50130025002300
उमराणेलालक्विंटल2500115191914000
पुणेलोकलक्विंटल9831200045003250
पुणे- खडकीलोकलक्विंटल15120024001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13260034003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल356150030002250
संगमनेरपांढराक्विंटल287030051112705
लासलगावउन्हाळीक्विंटल5326150040993800
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5900150041603750
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल140100040013850
कोपरगावउन्हाळीक्विंटल3345100045554150
कोपरगावउन्हाळीक्विंटल1640150050003980
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल8000200047313900
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1897200044003900
भुसावळउन्हाळीक्विंटल5160022002000
राहताउन्हाळीक्विंटल3542160050004050
उमराणेउन्हाळीक्विंटल6500101144504000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड