Join us

आज सोयाबीन तुरीला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 11:27 PM

जाणून घ्या आजचे सोयाबीन, तुरीचे दर

आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांना सुट्ट्या होत्या. तर आज बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली होती. वरोरा-खांबाडा बाजार समितीत सर्वांत जास्त ४६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी ४ हजार २०० रूपये हा सरासरी दर मिळाला. तर देवणी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त ४ हजार ७३३ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून वरोरा शेगाव येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी ४ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज उपलब्ध माहितीनुसार चार बाजार समितीमध्ये तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये शेवगाव येथे सर्वांत जास्त २५१ क्विंटल पांढरा वाणाची तूर आली होती. येथे सरासरी ८ हजार २०० रूपये दर मिळाला आहे. वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी ६ हजार ८०० रूपये एवढा दर मिळाला. येथे केवळ एक क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर देवणी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त ८ हजार ४०० रूपये दर मिळाला. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024
सिल्लोड---क्विंटल6710077007500
देवणी---क्विंटल50800088018400
वरोरा-खांबाडालालक्विंटल1660070006800
शेवगावपांढराक्विंटल251820085008200

 

आजचे सविस्तर सोयाबीन दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024
सिल्लोड---क्विंटल37450046004600
वरोरापिवळाक्विंटल22400045004350
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल43205045004100
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल46200044004200
देवणीपिवळाक्विंटल13471947484733
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजार