Join us

आज सोयाबीनला किती होता दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 8:36 PM

राज्यभरातील आजचे सोयाबीनचे दर घ्या जाणून

मागच्या दोन आठवड्यापासून सोयाबीनचे दर खाली उतरले आहेत. त्यामुळे ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल असलेला सोयाबीन त्यापेक्षाही कमी दरात विक्री होत आहे. एका महिन्यापूर्वी सोयाबीनला राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये ५ हजारांच्या वर दर होता. तर या महिन्यात दर कमी झाले आहेत. कापूस आणि कांद्याचीही हीच परिस्थिती असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, आजच्या उपलब्ध माहितीनुसार चार बाजार समित्यांमध्ये पिवळा या वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये वरोरा-शेगाव, बुलढाणा, देवणी, सिल्लोड या बाजार समित्यांचा सामावेश असून ४ हजार ते ४ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान दर मिळाला आहे. देवणी येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर मिळाला असून ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे. 

वरोरा-शेगाव येथे केवळ ४ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला तर येथे केवळ ४ हजार रूपये किमान दर मिळाला. तर देवणी येथे किमान दर ४ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल आणि ४ हजार ८९९ रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला आहे. तर ४ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2023
सिल्लोड---क्विंटल34450046654600
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल54400041004050
बुलढाणापिवळाक्विंटल400430047004500
देवणीपिवळाक्विंटल41470048994800
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीनकापूस