Lokmat Agro >बाजारहाट > जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

How will future cotton market prices be in January? know more | जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे.

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एरवी दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात कापूस दाखल होतो. यंदा उशीरा सुरू झालेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड यामुळे अनेक ठिकाणी कापूस अजूनही वेचणीला आलेला नाही. तर काही ठिकाणी कापसाची आवक अगदी कमी प्रमाणात सुरू आहे. यंदा हवामानाच्या तडाख्यामुळे कापसाचे मोठे नुकसान होऊन अंदाजे ३० ते ३५ टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहे. 

सध्या बाजारात दाखल होणाऱ्या कापसाला सरासरी साडेचार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात आजतागायत खासगी बाजारात दीड लाख गाठींची कापूस खरेदी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कापूस बाजारात दाखल होण्याची शक्यता असून संभाव्य बाजारभाव काय असतील याची शेतकऱ्यांना काळजी आहे.

आयात आणि निर्यात
कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे 'व्हाइट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत 3.84% वाढ आणि निर्यातीत 1.81% घट झाली आहे.

जागतिक उत्पादनाची स्थिती:
गेल्या वर्षी 14 वर्षामधील नीचांकी उत्पादनावर गेल्यानंतर, भारतातील कापूस पीक 337 लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 26 लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे. 2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (0.5 टक्के किंवा 600,000 गाठी) ते 115.0 दशलक्ष गाठी.  अमेरिकेत जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे.

संभाव्य बाजारभावाचा अंदाज
गेल्या चार महिन्यांपासून अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव थोडे कमी होत आहेत. मागील तीन वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे:

  • जानेवारी ते मार्च २०२१: रु ५६७७ प्रति क्विंटल 
  • जानेवारी ते मार्च २०२२: रु. ९५२८ प्रति क्विंटल 
  • जानेवारी ते मार्च २०२३: रु ८,०८३ प्रति क्विंटल 


जानेवारी ते मार्च २०२४  या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७००० ते ८००० प्रति क्विंटल राहतील असा अंदाज पुणे येथील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष ( फोन: ०२० - २५६५६५७७, टोल फ्री: १८०० २१० १७७०)यांनी वर्तविला आहे.

कापसाचे सध्याचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

१ नोव्हे. २३
उमरेडलोकल144712071507135
वरोरालोकल23695172007100
कोर्पनालोकल52600069006500
३१ ऑक्टो.२३
सावनेर---800705070507050
दारव्हा---14700071007050
हिंगणा

एकेए -८४०१

- मध्यम

स्टेपल

10650070006500
उमरेडलोकल104706071807100
वरोरालोकल44700071517050
वरोरा-माढेलीलोकल231700072507100
कोर्पनालोकल272650070216900
वर्धामध्यम स्टेपल180700072507100

Web Title: How will future cotton market prices be in January? know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.