एरवी दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात कापूस दाखल होतो. यंदा उशीरा सुरू झालेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड यामुळे अनेक ठिकाणी कापूस अजूनही वेचणीला आलेला नाही. तर काही ठिकाणी कापसाची आवक अगदी कमी प्रमाणात सुरू आहे. यंदा हवामानाच्या तडाख्यामुळे कापसाचे मोठे नुकसान होऊन अंदाजे ३० ते ३५ टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहे.
सध्या बाजारात दाखल होणाऱ्या कापसाला सरासरी साडेचार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात आजतागायत खासगी बाजारात दीड लाख गाठींची कापूस खरेदी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कापूस बाजारात दाखल होण्याची शक्यता असून संभाव्य बाजारभाव काय असतील याची शेतकऱ्यांना काळजी आहे.
आयात आणि निर्यातकापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे 'व्हाइट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत 3.84% वाढ आणि निर्यातीत 1.81% घट झाली आहे.
जागतिक उत्पादनाची स्थिती:गेल्या वर्षी 14 वर्षामधील नीचांकी उत्पादनावर गेल्यानंतर, भारतातील कापूस पीक 337 लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 26 लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे. 2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (0.5 टक्के किंवा 600,000 गाठी) ते 115.0 दशलक्ष गाठी. अमेरिकेत जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे.
संभाव्य बाजारभावाचा अंदाजगेल्या चार महिन्यांपासून अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव थोडे कमी होत आहेत. मागील तीन वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे:
- जानेवारी ते मार्च २०२१: रु ५६७७ प्रति क्विंटल
- जानेवारी ते मार्च २०२२: रु. ९५२८ प्रति क्विंटल
- जानेवारी ते मार्च २०२३: रु ८,०८३ प्रति क्विंटल
जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७००० ते ८००० प्रति क्विंटल राहतील असा अंदाज पुणे येथील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष ( फोन: ०२० - २५६५६५७७, टोल फ्री: १८०० २१० १७७०)यांनी वर्तविला आहे.
कापसाचे सध्याचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
१ नोव्हे. २३ | |||||
उमरेड | लोकल | 144 | 7120 | 7150 | 7135 |
वरोरा | लोकल | 23 | 6951 | 7200 | 7100 |
कोर्पना | लोकल | 52 | 6000 | 6900 | 6500 |
३१ ऑक्टो.२३ | |||||
सावनेर | --- | 800 | 7050 | 7050 | 7050 |
दारव्हा | --- | 14 | 7000 | 7100 | 7050 |
हिंगणा | एकेए -८४०१ - मध्यम स्टेपल | 10 | 6500 | 7000 | 6500 |
उमरेड | लोकल | 104 | 7060 | 7180 | 7100 |
वरोरा | लोकल | 44 | 7000 | 7151 | 7050 |
वरोरा-माढेली | लोकल | 231 | 7000 | 7250 | 7100 |
कोर्पना | लोकल | 272 | 6500 | 7021 | 6900 |
वर्धा | मध्यम स्टेपल | 180 | 7000 | 7250 | 7100 |