Join us

Soybean Rates : सोयाबीनची आवक घटली! दरही मिळतोय हमीभावाच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 7:25 PM

हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १ हजार ७४८ क्विंटल आवक झाली होती.

यंदा सोयाबीनच्या दरानेही शेतकऱ्यांची निराशा केली असून आता कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर आलेल्या उत्पादनालाही चांगला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तर सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली असून दरही कमीच मिळत असल्याचे चिन्ह आहे. 

दरम्यान, मार्च महिन्याचे शेवटचे दोन दिवस राहिले असून आज सोयाबीनची केवळ हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १ हजार ७४८ क्विंटल आवक झाली होती. तर राज्यातील इतर बाजार समितीमध्ये केवळ १ क्विंटल, ५ क्विंटल ते १०० क्विंटलपर्यंत आवक झाली होती. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक तटपुंजी असल्याचे चित्र आहे. तर दरही हमीभावापेक्षा कमीच मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. 

आज बाजारात लोकल आणि पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नाही. आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ४१० रूपये प्रतिक्विंटल हा सरासरी दर किल्ले धारूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. तर वरोरा आणि वरोरा-शेगाव बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ हजार ५०० रूपयांचा सरासरी दर मिळाला. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/03/2024
सिल्लोड---क्विंटल5425043504300
नागपूरलोकलक्विंटल114410043314273
हिंगणघाटपिवळाक्विंटल1748280045303800
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल1420042004200
भोकरदनपिवळाक्विंटल13420044004300
भोकरपिवळाक्विंटल3428242824282
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल55421043204265
देउळगाव राजापिवळाक्विंटल13410041004100
वरोरापिवळाक्विंटल25280040003500
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल33300040003500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल60320040003600
किल्ले धारुरपिवळाक्विंटल21420044114410
हिमायतनगरपिवळाक्विंटल68420044004300
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजारमार्केट यार्ड