Join us

जालन्यात मध्यम स्टेपल कापसाच्या जातीला मिळतोय सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:10 PM

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज सकाळच्या सत्रात  १६९० क्विंटल कापसाची आवक झाली. जालन्यात मध्यम स्टेपल ए. ...

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज सकाळच्या सत्रात  १६९० क्विंटल कापसाची आवक झाली. जालन्यात मध्यम स्टेपल ए. के.एच ४ जातीला सर्वाधिक भाव मिळत आहे.

बुलढाण्यात आज सर्वाधिक कापसाची आवक झाली. यावेळी १२०० क्विंटल लोकल कापसाची आवक झाली होती. शेतकऱ्यांना यावेळी सर्वसाधारण ७४०५ रुपये भाव मिळत आहे.राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक आवक होत आहे.

कुठे काय मिळाताहेत कापसाला भाव?

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/03/2024
बुलढाणालोकलक्विंटल1200700077657405
जालनाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल150680078007700
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल340740078007750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1690

 

टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्ड