पुरेशा पुरवठ्याअभावी लसणाच्या किमती किलोमागे ४००च्या घरात गेल्या आहेत. एकीकडे कांदा टंचाईची समस्या असताना आता लसणाचेही भाव गेल्या सहा आठवड्यात दुप्पट झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ बाजारात सध्या वेगवेगळया बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो लसणाला ३०० ते ४०० रुपये भावाने विकला जात आहे.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. सामन्यत: हिवाळ्यात लसणाच्या किमती वाढलेल्या पुरवठ्याअभावी वाढलेल्या असतात. यंदा दक्षिणेतील राज्यांमधून पुरवठा कमी झाला आहे. हवामान बदलाने राज्यातील लसूण खराब झाला आहे.
संकरीत लसणाचे उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये अवकाळी पावसाने पिके वाया गेली आहेत.दुसरीकडे देशी वाणही बाजारातून गायब झाल्याने लसणाच्या किमती वाढल्या आहेत. काल राज्यातील बाजार समित्यांमध्ये लसणाला प्रतिक्विंटल १२ हजार ते २७ हजार रुपये भाव मिळाला.
देशी लसणाचे उत्पादन दक्षिणेतील राज्यांमधून होते. कर्नाटकातून येणारे देशी वाण आता बाजारपेठांमध्ये दिसत नसल्याने संकरित लसणासाठी २५० ते ३०० रुपये दर आकारला जात आहे. हा देशी लसूण बाजारात येण्यास अजून दोन महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लसणाचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.
कोणत्या बाजारसमितीत लसणाला काय भाव मिळाला?
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/12/2023 | ||||||
अहमदनगर | --- | क्विंटल | 3 | 12000 | 20000 | 16000 |
अकोला | --- | क्विंटल | 168 | 18000 | 24000 | 22000 |
राहता | --- | क्विंटल | 4 | 20000 | 25000 | 22500 |
हिंगणा | --- | क्विंटल | 1 | 18000 | 18000 | 18000 |
नाशिक | हायब्रीड | क्विंटल | 8 | 14000 | 22000 | 19000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 19 | 15000 | 27000 | 21000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 4 | 12000 | 12000 | 12000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 420 | 14000 | 24000 | 21250 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 16000 | 20000 | 18000 |