Join us

पुण्यात आज २९८ क्विंटल शेवग्याची आवक, मिळतोय असा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 3:16 PM

आज रविवारी आवक कमी पण आठवडाभरापासून मिळतोय चांगला दर..

उन्हाळा सुरु झाला की बाजारात शेवग्याची आवक वाढते. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत शेवगा विक्रीसाठी दाखल होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना किलोमागे ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे.

दरम्यान, आज राज्यात पुणे बाजारसमितीत २९८ क्विंटल लोकल जातीच्या शेवग्याची आवक झाली होती. यावेळी शेवग्याला सर्वसाधारण १४०० ते २२५० रुपयांचा दर मिळाला.

पुण्याशिवाय आज सातारा आणि राहता बाजारसमितीत २४ व ७ क्विंटल अशी शेवग्याची आवक झाली होती. यावेळी सर्वसाधारण १००० ते १५०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मागील आठवडाभरापासून शेवग्याला सर्वसाधारण ३००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून आज रविवारी आवक कमी झाली होती.

टॅग्स :बाजारपुणे