टोमॅटोचा दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत गेल्यामुळे ग्राहक खूपच नाराज झाले होते. पण, महिनाभरातच टोमॅटोचे दर निम्म्यावर आले असून गुरुवारी सौद्यात प्रति किलो २५ ते ३५ रुपये दर मिळाला आहे. तसेच, सांगलीत किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये किलो दर होता. या दरामुळे ग्राहक समाधानी असला तरी शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे.
राज्यात २२ डिसेंबर ते २३ फेब्रुवारीपर्यंत टोमॅटोचे दर ६ ते ९ रुपये किलो दरम्यान होते. मार्च महिन्यात टोमॅटोचे दर ११ रुपये प्रति किलो होते. तर, एप्रिलमध्ये ते पुन्हा १० रुपये किलोपर्यंत होते. कमी किमतीमुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसान झाले. विलंब झालेल्या पावसामुळे नवीन गाठली होती. लागवड कमी झाली. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अत्यंत कमी दर मिळाला.
पाऊस कमी झाल्यामुळे नवीन टोमॅटो पिकाची लागण झाली नाही. जुलै महिन्यात टोमॅटोचे दर वाढले किलोसाठी दराने केव्हाच शंभरी होती. टोमॅटोच्या दरांमध्ये अचानक वेगाने झालेल्या वाढीला कमी पुरवठा हेही एक कारण होते. पण, सध्या सौद्यामध्ये टोमॅटोला प्रति किलो २५ ते ३५ रुपये दर मिळाला आहे. सांगलीत आठवडा बाजारात टोमॅटोची किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांनी चालू होती.
टोमॅटोला १०० ते १२० रुपये दर मिळत होता. पण, सध्या आवक वाढल्यामुळे प्रतिकिलो सौद्यामध्ये २५ ते ३५ रुपये दर मिळाला आहे. किरकोळ विक्रेते ग्राहक पाहून विक्री करत आहेत. आठवडा बाजारात ४० ते ६० रुपये किलोला सरासरी दर मिळत आहे. - मनोज गाजी, कृषी सल्लागार