Lokmat Agro >बाजारहाट > उन्हाळ्यात आरोग्यदायी डोंगराची काळी मैना खातेय भाव

उन्हाळ्यात आरोग्यदायी डोंगराची काळी मैना खातेय भाव

In summer, the healthy karonda fruit get good market price | उन्हाळ्यात आरोग्यदायी डोंगराची काळी मैना खातेय भाव

उन्हाळ्यात आरोग्यदायी डोंगराची काळी मैना खातेय भाव

मागील आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने रानमेव्याला फटका बसला असून किलोला २४० रुपये दराने विक्री होत आहे.

मागील आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने रानमेव्याला फटका बसला असून किलोला २४० रुपये दराने विक्री होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत हवाहवासा वाटणारा जंगलाचा राजा म्हणून ओळखली जाणारी डोंगरावरची काळी मैना मागील आठ दिवसांपासून शहरातील टिळक चौक, सातरस्ता, लक्ष्मी मार्केट, विजापूर रोड, आसरा चौक आदी भागांत करवंदे विक्रीस उपलब्ध झाली आहेत.

मात्र मागील आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने रानमेव्याला फटका बसला असून किलोला २४० रुपये दराने विक्री होत आहे. काळी मैना, डोंगरची मैना असा आवाज गल्लीबोळात घुमला की, दारात येऊन खरेदीसाठी झुंबड उडत आहे.

वर्षातून एकदा मिळणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात आबालवृद्ध आवर्जून चवीने खाताना दिसतात. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सातारा, धाराशिव व कोकणात खूप प्रमाणात मिळतात.

एप्रिल मे महिन्यात आंबा, काजू फणस, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात. चवीने आंबट-गोड असणारे करवंद खट्टा-मीठा या नावाने देखील ओळखला जाणारा हा रानमेवा शरीरासाठी खूप गुणकारी आहे.

उकाड्यात खूप लाभदायक
-
रक्तातील कमतरता, अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद गुणकारी आहे.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचाविकार बरे होतात, रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते.
- उष्णतेचे विकार बरे होतात, अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचं सरबत गुणकारी आहे.
- करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
- अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.

अधिक वाचा: नाद केला पण वाया नाय गेला; कलिंगडात आंतरपीक मिरचीचा यशस्वी प्रयोग

Web Title: In summer, the healthy karonda fruit get good market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.