Join us

अकलूजच्या मार्केटमध्ये डाळिंबाला मिळाला दोनशे रुपयांचा उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 10:24 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळींब सौदे बाजारात गारअकोले (ता. माढा) येथील शेतकरी संतोष केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला आडत व्यापारी राजू भाई व इमरान भाई यांच्या मोहम्मद साद आणि कंपनीने प्रतिकिलो २०० रुपये भाव दिला.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळींब सौदे बाजारात गारअकोले (ता. माढा) येथील शेतकरी संतोष केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला आडत व्यापारी राजू भाई व इमरान भाई यांच्या मोहम्मद साद आणि कंपनीने प्रतिकिलो २०० रुपये भाव दिला.

वरिष्ठ पातळीवर डाळिंबाची वाढती मागणी लक्षात घेता यापुढे डाळिंबाला चांगला भाव मिळेल. येथील डाळींब मार्केट सौदे बाजारात माण, इंदापूर, सांगोला, पंढरपूर, माढा तालुक्याच्या भागातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक वाढत आहे. डाळिंबास चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी होऊन विश्वास वाढला आहे. शेतकरी शेतातून डाळिंब विक्री न करता अकलूज बाजार समितीच्या डाळींब मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणे पसंत करीत आहेत.

डाळींब खरेदी करण्यामध्ये सादिक भाई, खंडू नाना, निजामभाई, बालाजी इंगळे, राजू भाई, एम. एम. इमरान भाई, भाऊसाहेब घाडगे, अमीरभाई, युसूफभाई, मुन्ना चौधरी, अक्षय सोनवणे, सागर नागणे, नागेश केदार, कोकरे, अन्य व्यापारी व आडतदारांत माल वाढीव दराने खरेदी करण्यात चुरस निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला नेहमीच चांगला दर व अन्य सुविधा देण्यात बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक मंडळ, सचिव राजेंद्र काकडे, अन्य कर्मचारी दक्ष व अग्रेसर असतात.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबास चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी डाळींब लागवडीकडे वळल्याचे दिसत आहे.

टॅग्स :मार्केट यार्डबाजारसोलापूरफळे