राज्यात रविवार आणि सोमवारी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बाजार समित्या पुन्हा सुरु झाल्या आहेत.दरम्यान,राज्यात आज सकाळच्या सत्रात ९९४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
पिवळ्या सोयाबीनला मिळणारा सर्वसाधारण दर हा बहुतांशी हमीभावापेक्षा कमीच असल्याचे दिसून आले आहे. ४००० ते ४६०० पर्यंतच सोयाबीनला भाव मिळत असल्याचे दिसून आले. आज सकाळी बाजार समित्यांमध्ये पिवळा, हायब्रीड आणि लाेकल सोयाबीनची आवक झाली.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त कृषी उत्पन्न बाजारसमित्यांही बंद
सोयाबीनच्या भावाची पडझड चालू असताना सोयाबीनला हमीभावाइतकाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असताना अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी भावात विक्री होत आहे.
यवतमाळ सोडता बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर या बाजारसमित्यांमध्ये सोयाबिनला सर्वसाधारण ४२०० ते ४६०० प्रतिक्विंटल भाव मिळाला.
कोणत्या बाजारसमितीत किती सोयाबीनची आवक झाली? जाणून घ्या..
दोन दिवसाच्या खंडानंतर बाजारसमित्या पुन्हा सुरु
रविवार आणि सोमवारी अयोध्या राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. सलग दोन दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत.