राज्यात आज ७ हजार ७९९ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी सकाळच्या सत्रात लाल, पांढरा, गज्जर तूरीची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ८५०० ते ९९०० रुपयांचा भाव मिळाला.
अमरावती बाजारसमितीत आज लाल तूरीची सर्वात अधिक ५०७६ क्विंटल आवक झाली. तूरीला क्विंटलमागे कमीत कमी ९५०० तर जास्तीत जास्त १० हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.धाराशिव बाजारसमितीत गज्जर तूरीची ९१ क्विंटल एवढी आवक झाली. क्विंटलमागे मिळणार सर्वसाधारण दर ९००० रुपये एवढा होता.
नागपूरच्या लाल तूरीला सर्वसाधारण ९८६३ रुपये क्विंटलमागे मिळाले. तर सोलापूर बाजारसमितीत २३० क्विंटल लाल तूरीची आवक झाली. कमीत कमी ९३०० तर जास्तीत जास्त १० हजार ३५० रुपयांचा दर मिळत आहे.
जाणून घ्या कुठे काय स्थिती..
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
12/03/2024 | ||||
अमरावती | लाल | 5076 | 9500 | 9900 |
छत्रपती संभाजीनगर | --- | 25 | 8300 | 9000 |
धाराशिव | गज्जर | 91 | 9801 | 9951 |
जालना | लाल | 13 | 6101 | 9410 |
जालना | पांढरा | 15 | 5670 | 8500 |
नागपूर | लाल | 2338 | 9000 | 9863 |
परभणी | लाल | 11 | 9000 | 9200 |
सोलापूर | लाल | 230 | 9300 | 9825 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 7799 |