Join us

सकाळच्या सत्रात तुरीला क्विंटलमागे मिळतोय असा बाजारभाव..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 12, 2024 2:19 PM

आज सकाळच्या सत्रात क्विंटलमागे तूरीला मिळतोय एवढा भाव...

राज्यात आज ७ हजार ७९९ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी सकाळच्या सत्रात लाल, पांढरा, गज्जर तूरीची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ८५०० ते ९९०० रुपयांचा भाव मिळाला.

अमरावती बाजारसमितीत आज लाल तूरीची सर्वात अधिक ५०७६ क्विंटल आवक झाली. तूरीला क्विंटलमागे कमीत कमी ९५०० तर जास्तीत जास्त १० हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.धाराशिव बाजारसमितीत गज्जर तूरीची ९१ क्विंटल एवढी आवक झाली. क्विंटलमागे मिळणार सर्वसाधारण दर ९००० रुपये एवढा होता. 

नागपूरच्या लाल तूरीला सर्वसाधारण ९८६३ रुपये क्विंटलमागे मिळाले. तर सोलापूर बाजारसमितीत २३० क्विंटल लाल तूरीची आवक झाली. कमीत कमी ९३०० तर जास्तीत जास्त १० हजार ३५० रुपयांचा दर मिळत आहे.

जाणून घ्या कुठे काय स्थिती..

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
12/03/2024
अमरावतीलाल507695009900
छत्रपती संभाजीनगर---2583009000
धाराशिवगज्जर9198019951
जालनालाल1361019410
जालनापांढरा1556708500
नागपूरलाल233890009863
परभणीलाल1190009200
सोलापूरलाल23093009825
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7799
टॅग्स :तुराबाजारमार्केट यार्ड