Lokmat Agro >बाजारहाट > नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव?

नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव?

In the new rice market, prices may decrease if the arrival increases, what is the current price? | नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव?

नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव?

जानेवारीनंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो.

जानेवारीनंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात काही ठिकाणी डिसेंबर, जानेवारीपासून नवीन तांदूळ बाजारात विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे तांदळाचे दर पाच ते दहा रुपयांनी उतरले असल्याचे चित्र आहे. ६५ ते ७० रुपयांनी विकला जाणारा कोलम तांदूळ सध्या ५८ ते ६० रुपयांनी विक्री होत आहे.

जानेवारीनंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो. सध्या जिल्ह्यात नूरजहाँ, चाँदतारा, कोलम, इंद्रायणी, लगान, खुशीयापल, कालीमूंछ, ऐश्वर्या आदी जातीचे तांदूळ विक्री होतात. हिंगोलीच्या बाजारात या तांदळाला मागणी आहे. राज्यातील काही जिल्ह्यातही तांदळाचे उत्पादन झाले असल्याने हा तांदूळही बाजारात आल्याने सध्या तांदळाचे दर काहीसे कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ६५ ते ७० रुपयांनी विकला जाणारा कोलम तांदूळ आता ५८ ते ६० रुपये प्रमाणे विक्री होत आहे.नवीन तांदूळ बाजारात दाखल होत आहे.

हिंगोलीच्या बाजारपेठेत आणखी नवीन तांदूळ आला नसला तरी भावात मात्र फरक जाणवत आहे. तांदळाचे दर ५ ते १० रुपये कमी झाल्याचे सध्या तरी पाहावयास मिळत आहे.

भाव आणखी कमी होणार का ?

नवा तांदूळ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारात दाखल होतो. तांदूळ निर्यात केल्यास भावात तेजी येऊ शकते. सध्या निर्यात कमी असल्याने भाव स्थिर आहेत. अशीच स्थिती राहिल्यास भाव कमी होऊ शकतात.

व्यापारी म्हणतात...

राज्यातील गडचिरोली, वर्धा, नाशिक, चंद्रपूर, पुणे, तळेगाव आदी परिसरात तांदूळ उत्पादित केला जातो. तसेच देशात विविध प्रकारचे तांदूळ उत्पादित होतात; मात्र महाराष्ट्रातील तांदूळ सुगंधित व चवदार असल्याने देशभर विक्री होतो. सध्या भाव कमी झालेले असले तरी नवीन तांदूळ बाजारात येत असल्याने पुढील महिन्यात दरात किमान ५ रुपयांपर्यंत घट होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: In the new rice market, prices may decrease if the arrival increases, what is the current price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.