Join us

राज्यात आवक घटली, कांदा बाजारभाव कसा मिळाला? आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 3:43 PM

एकीकडे कांदा पिकावर होणारा खर्च वाढत असताना दुसरीकडे अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

एकीकडे कांदा पिकावर होणारा खर्च वाढत असताना दुसरीकडे अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत असलेल्या निर्यात बंदीमुळे  कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. बाजारभावच मिळत नसल्याने शेतकरी हतबल असून कधी निर्यात खुली होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. अशातच आजच्या बाजारभावाचा विचार केला तर लासलगाव बाजारसमितीमध्ये चारशे नगांची आवक झाली. जवळपास 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

आज 24 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजारसमितीमध्ये लाल कांद्याची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 14 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 700 रुपये मिळाला तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत 13 हजार 200 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 900 रुपये दर मिळाला. तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 11 हजार 900 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1750 दर मिळाला.

राज्यातील कांदा बाजारभाव कोल्हापूर बाजार समितीत 5125 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1500 रुपये दर मिळाला. पुणे-मोशी बाजार समितीत 764 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर देखील 850 रुपये दर मिळाला. नागपूर मार्केटमध्ये आज पांढऱ्या कांद्याची 600 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2125 दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 1444 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 250 रुपये तर सरासरी केवळ 1100 रुपये दर मिळाला.

असे आहेत राज्यातील बाजार समित्यांमधील दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2024
कोल्हापूर---क्विंटल512570024001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल144425019501100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8387100022501500
येवलालालक्विंटल1400070018501700
येवला -आंदरसूललालक्विंटल600025018511700
धुळेलालक्विंटल87925020001870
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1320090018751725
नागपूरलालक्विंटल600140022002025
सिन्नर - नायगावलालक्विंटल33650018501700
राहूरी -वांबोरीलालक्विंटल147120021001200
मनमाडलालक्विंटल200050018651625
भुसावळलालक्विंटल26100016001200
यावललालक्विंटल64590940750
पुणे-मोशीलोकलक्विंटल7645001200850
मंगळवेढालोकलक्विंटल5945020001300
नागपूरपांढराक्विंटल600160022002125
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1190030021621750

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक