Lokmat Agro >बाजारहाट > pigeon pie: उत्पादन घटल्याने आवक मंदावली, तूरीचा बाजारभाव उच्चांकी

pigeon pie: उत्पादन घटल्याने आवक मंदावली, तूरीचा बाजारभाव उच्चांकी

Income decreased; To the high-ranking brother! | pigeon pie: उत्पादन घटल्याने आवक मंदावली, तूरीचा बाजारभाव उच्चांकी

pigeon pie: उत्पादन घटल्याने आवक मंदावली, तूरीचा बाजारभाव उच्चांकी

पावसाने ताण दिल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पावसाने ताण दिल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

शेअर :

Join us
Join usNext

 pigeon pie: तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढली असल्याने तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीला सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. कमाल भाव १२ हजार ३१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचल्याने एप्रिलमध्येच तुरीची उच्चांकी भावाकडे धाव होत असल्याचे दिसून येत आहे.

हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक...

  • गत खरीप हंगामात पेरा कमी होण्याबरोबरच उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात होत आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळतो म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच कर्नाटक, तेलंगणा या सीमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. गत खरिपात विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्यांना उशीर झाला होता. 
     
  • केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता. तो ६३ टक्के असा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.उन्हाळा सुरू झाल्याने बाजार समितीत इतर शेतमालाचीही आवक अत्यंत कमी झाली आहे.
     

एका आठवड्यात हजार रुपयांची वाढ

बुधवारी तुरीला १२ हजार ३१ रुपये प्रतिक्चिटल असा कमाल भाव मिळाला. सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये, तर किमान १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. विशेषतः एका आठवड्यात जवळपास एक हजार रुपयांनी दर वाढले असल्याचे दिसून येत आहे.

आणखीन दर वाढणार...

तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवकही घटली आहे. त्यामुळे दाल मिलसाठी पुरेशा प्रमाणात तूर उपलब्ध होत नाही. शिवाय, जुना साठाही नाही. त्यामुळे दरवाढ होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या कालावधीत तुरीला उच्चांकी जवळपास १२ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, यंदा एप्रिलमध्येच दर वाढले आहेत. आगामी काळात आणखीन दरवाढ होईल.

हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक...

  •  गत खरीप हंगामात पेरा कमी होण्याबरोबरच उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात होत आहे.
  • सध्या दररोज जवळपास एक हजार ते दीड हजार विचेटलपर्यंत आवक होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी केवळ १ हजार १९० क्विंटलपर्यंत आवक झाली होती.

Web Title: Income decreased; To the high-ranking brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.