Lokmat Agro >बाजारहाट > जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी!

जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी!

Incoming also in June; Purchase of five lakh quintals of cotton in Salu! | जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी!

जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी!

निमशासकीय, शासकीय, खासगी बाजार समितीमध्ये आवक

निमशासकीय, शासकीय, खासगी बाजार समितीमध्ये आवक

शेअर :

Join us
Join usNext

यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेवटपर्यंत शेतकऱ्यांना होती. मात्र, जून महिन्यापर्यंतही कापसाच्या भावात वाढ झाली नसल्याने अनेक महिन्यांपासून घरात ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीस आणला आहे. निमशासकीय व खासगी बाजार समितीकडून ५ लाख ३७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

दोन वर्षापूर्वी कापसाला विक्रमी भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. महागडी बियाणे, खते, औषधी घेऊन आणि चांगले उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. परंतु, कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आज ना, उद्या भाव वाढेल या अपेक्षेवर कापसाची विक्री केली नव्हती. मात्र, खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक महिन्यांपासून घरात ठेवलेला कापूस विक्रीस आणला आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू शहर व परिसरात जवळपास दहा कापूस प्रेसिंग जिनिंग आहेत. तसेच कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. त्यामुळे शहरातील निमशासकीय व खासगी बाजार समितीत तालुक्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होते. यंदा शहरातील दोन व्यापाऱ्यांना खासगी बाजार समितीचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे आठवड्यातील प्रत्येकी तीन दिवस कापसाची खरेदी केली जाते.

गतवर्षी कापसाचे पीक भरत असतानाच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यातच कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. विशेष म्हणजे कापुस लागवडीपासून ते विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना यावर मोठा खर्च करावा लागतो. त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सिंचनाच्या सोयी अपुरे असल्यामुळे कापूस व सोयाबीन शिवाय इतर पिके घेण्यासाठी शेतकरी पुढे सरसावत नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. यंदा मात्र, कापूस, सोयाबीन पिकांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.

पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार

• तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार आहे.

• सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड करतात.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. कापूस खरेदी हंगामाच्या अस्वेरीस भाववाढ होईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. परंतु, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाच्या भावात अपेक्षित वाढ झाली नाही. दरम्यान, निमशासकीय बाजार समितीने आजपर्यंत २ लाख ८७ हजार तर खासगी बाजार समितीकडून २ लाख ५० हजार एवढी कापूस खरेदी केली असून जून महिन्यातही कापसाची आवक सुरूच आहे.

कापूस खरेदी (लाख क्विंटलमध्ये)

२०१४ - १५ - ४.१२
२०१५ - १६ - ३.४०
२०१६ - १७ - ४.८१
२०१७ - १८ - ६.३७
२०१८ - १९ - ४.५०
२०१९ - २० - ८.६०
२०२० - २१ - ६.९
२०२१ - २२ - ३.६२
२०२२ - २३ - ५.२२
२०२३ - २४ - ५.३७

१६ गाव शिवारात सिंचन प्रकल्प नाही

तालुक्यात निम्न दुधना सारखा प्रकल्प आहे. परंतु, दोन्ही कालव्याच्या वितरिका व लघुवितरिकाची कामे अपूर्ण असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. तसेच रवळगाव व देऊळगाव सर्कलमधील तब्बल १२६ गाव शिवारात एकही सिंचन प्रकल्प नाही.

हेही वाचा - आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

Web Title: Incoming also in June; Purchase of five lakh quintals of cotton in Salu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.