Lokmat Agro >बाजारहाट > Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला

Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला

Increase in price of turmeric in market yard of Hingoli; Gram also grew | Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला

Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला

२ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक

२ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली येथीलबाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी तीन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी १६ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. दरम्यान, गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

शहरातील संत नामदेव मार्केट यार्डात सध्या मराठवाड्यासह विदर्भातून हळदीची (Turmeric) विक्रमी आवक होत आहे. शनिवार आणि रविवारी बीट बंद ठेवण्यात येत असल्याने सोमवारी आवक वाढत असून, आदल्या दिवशीपासून शेतकरी हळद घेऊन दाखल होत आहेत.

त्यामुळे मार्केट यार्ड आवारासह रेल्वेस्टेशन रोडवर वाहनांची रांग लागत आहे. आवक वाढल्याने एका दिवसात मोजमाप करणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांना एक ते दोन दिवस मुक्कामी राहण्याची वेळ येत आहे.

२७ मे रोजी २ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक झाली होती. १५ हजार ३०० ते १७ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर सरासरी १६ हजार ४०० रुपये भाव राहिला. hingoli market yard

हरभराही वधारला ...

जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे gram उत्पादन चांगले झाल्याने मोंढ्यात सरासरी ३०० ते ५०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. यंदा भावही समाधानकारक असून, ६ हजार ३०० ते ६ हजार ७०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी सरासरी पाचशे रुपयांनी भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

८०० क्विंटल सोयाबीन

येथील मोंढ्यात सोमवारी ८३३ क्चिटल सोयाबीनची आवक झाली होती. किमान ४ हजार ९० ते कमाल ४ हजार ४७७ रुपयांदरम्यान भाव मिळाला. यंदा सोयाबीनचे (Soybean) भाव कायम पडते असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तर गत आठवड्यात सरासरी १५ हजार ५८० रुपयांचा भाव मिळाला होता. जवळपास पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Increase in price of turmeric in market yard of Hingoli; Gram also grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.