Join us

मंचर बाजार समितीत कोथिंबीरीची मोठी आवक.. शेकड्याला कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:46 AM

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत आहेत. मेथीची एक जुडी २८ रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी ३५ रुपयांना विकली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत आहेत. मेथीची एक जुडी २८ रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी ३५ रुपयांना विकली गेल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला लिलावाला नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी रात्री कोथिंबिरीच्या ३८ हजार १३० जुड्यांची आवक झाली.

कोथिंबिरीला शेकडा २०१ ते ३५०१ रुपये असा भाव मिळाला आहे, म्हणजे चांगल्या प्रतीची कोथिंबीर एक जूडी पस्तीस रुपयांना विकली गेली आहे. 

मेथीच्या २३ हजार ४९५ जुड्यांची आवक झाली शेकडा ७०१ ते २८०१ रुपये असा भाव मेथीला मिळाला आहे. शेपूच्या ८ हजार ४६९ जुड्यांची आवक झाली शेकडा २०० ते १८५१ रुपये असा भाव मिळाला आहे.

तांदुळजा ५०५ जुड्यांची आवक होऊन त्यांना ३०१ ते ५०१ रुपये असा भाव मिळाला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आवक कमी होऊन भाव वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डभाज्यामंचरपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती