मागील आठवड्यापासून गडचिरोली परिसरात उष्णतेचा पारा वाढला गेल्याने सकाळी दहा वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. न तर, दुसरीकडे यंदा उन्हाच्या न तडाख्यामुळे पालेभाज्या व न फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांवर आली आहे.
लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो १३० ते १५० रुपयांवर पोहोचले असून, एका लिंबासाठी नागरिकांना सात ते आठ रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. घाऊक बाजारात लिंबांचे दर दुपटीने वाढले आहेत, तर किरकोळ बाजारात एक लिंबू सात रुपयांना विकले जात आहे.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो.
असे आहेत आजचे गुरुवार (दि.०९) राज्याच्या विविध बाजारातील लिंबूचे दर व आलेली आवक
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
09/05/2024 | ||||||
कोल्हापूर | --- | क्विंटल | 8 | 5000 | 10000 | 7500 |
राहता | --- | क्विंटल | 9 | 5000 | 11000 | 8000 |
कल्याण | हायब्रीड | क्विंटल | 3 | 9000 | 9500 | 9250 |
पुणे | लोकल | क्विंटल | 203 | 400 | 5000 | 2700 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 29 | 8000 | 10000 | 9000 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 610 | 2500 | 4000 | 3200 |