रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली असून, शहरात सुकामेव्यासह कपडे, सौंदर्यप्रसाधने, अत्तर आणि इतर वस्तूच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची अलोट गर्दी होत आहे. विशेष म्हणजे दुकानात महिला, चिमुकल्यांच्या कपड्यांना अधिक मागणी आहे.
बाजारपेठेत व्यावसायिकांनी नवनवीन पॅटर्न विक्रीसाठी आणले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील मुख्य बाजापेठेतील सराफा मार्केट, पोलिस स्टेशनसमोर, नगरपरिषदेसमोर आदी ठिकाणी कपडे, ज्वेलरी, विविध सौंदर्यप्रसाधने, पादत्राणे, सुकामेवा, सुगंधी अत्तर, घरातील साहित्य, शोभेच्या वस्तूसह खजूर, फळे आणि विविध प्रकारच्या शेवयांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधव उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने
खजूर व शेवयांना मागणी
रमजान ईदला मुस्लिम बांधव घरी शीरखुर्मा बनवून आप्तेष्टांना घरी बोलवतात. त्यामुळे शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारे बदाम, काजू, खजूरला मोठी मागणी आहे. परंतु, यंदा महगाईमुळे खरेदीमध्ये फरक पडला आहे. - फरमान सिद्दीकी, किराणा दुकानचालक
कपड्यांना ही चांगली मागणी
रमजान ईदनिमित्त व्यावसायिकांनी दुकानात नवनवीन पॅटर्न विक्रीसाठी आणले आहेत. चिमुकल्यांकडून विविध डिझाइन, आकर्षक कपड्यांना मागणी होत आहे. सध्या दुकानात मोठी गर्दी होत आहे. - शेख असलम, कापड दुकानदार