Join us

Groundnut Market बाजारात भुईमूग शेंगाची आवक वाढली; प्रतिक्विंटलचे दर पोहोचले ६ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:18 AM

जिल्ह्यातील बाजार समितीत दरात चढ-उतार कायम

खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. भुईमूग शेंगांची साठवणूक न करता शेतकरी विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढली आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी भुईमूग शेंगांना ६ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत उच्चतम दर मिळाला. तर, कारंजा बाजार समितीमध्ये शेंगाला सरासरी ५८०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगांच्या दरात हंगामाच्या सुरुवातीपासूनच चढ उतार पाहावयास मिळत आहे. गत आठवड्याच्या प्रारंभी शेंगांना ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेंगांचे दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले.

सरासरी दर कधी ६ हजारांपर्यंत, तर कधी ५ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी भुईमूग शेंगांना हंगामाच्या प्रारंभी प्रतिक्विंटल ७ हजारांवर भाव मिळाले होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत भावात चढ-उतार राहिला. यंदा तर अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी भावात शेंगांची विक्री करावी लागत आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे दर मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात वाढ

सरत्या आठवड्यात भुईमूग शेंगांना कधी ५३०० ते ५८००, तर कधी ५५०० ते ६२०० पर्यंत दर मिळाला. या आठवड्यात चढ-उतार कायम असल्याचे पाहावयास मिळाले. सोमवारी नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मानोरा बाजार समितीमध्ये शेंगांच्या दरात वाढ झाली. किमान दरात ३०० रुपयांची तर अधिकाधिक दरात ५० रुपयांची क्विंटलमागे दरवाढ झाली होती. आता पुढील दिवसांत भुईमूग शेंगाला किती दर मिळतो. याकडे उत्पादकांचे लक्ष आहे.

बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे दर

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगाला वेगवेगळे दर मिळत आहेत. सोमवारी सर्वच बाजार समित्यांमध्ये सरासरी ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता.

कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर

बाजार समितीकमीत कमीअधिकाधिकआवक
मानोरा५६५०६२५०१००
कारंजा४८५०१४५०१४५०

हेही वाचा - Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न

टॅग्स :बाजारवाशिमविदर्भखरीपशेतकरीशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्र