Lokmat Agro >बाजारहाट > मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर

मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर

Inflows slow in Marathwada, sale of soybeans higher in Vidarbha, prices are getting | मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर

मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर

पणन विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळच्या सत्रात पाच बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली असून...

पणन विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळच्या सत्रात पाच बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली असून...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील सोयाबीनची आवक सध्या वाढली असून मागील काही दिवसांपासून शेतकरी बाजार समितीमध्ये सोयाबीन घेऊन येत आहेत. सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मागील काही दिवसात साठवणुकेला पसंती दिली होती. परंतु आता पुन्हा एकदा सोयाबीनची आवक होत असून काल राज्यात 17,376 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.

आज सकाळच्या 17 तर राज्यात एकूण 3731 क्विंटल सोयाबीनच्या आवक झाली असून शेतकऱ्यांना क्विंटल मागे सरासरी 4000 ते 4200 रुपयांचा भाव मिळत आहे. 

सकाळपासून अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली व नागपूरमधील बाजार समितीत ही आवक झाली असून कमीत कमी 3500 ते 4200 रुपये दर सुरू आहे. मराठवाड्यात सोयाबीनची आवक मंदावली असून विदर्भात आवक वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील चार दिवसांपासून 50 ते 70 क्विंटल सोयाबीनची आवक होत असून सर्वसाधारण 4300 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. तर हिंगोलीच्या पिवळ्या सोयाबीनला 4275 रुपयांचा सर्वसाधारण दर आज सकाळच्या सत्रात मिळत आहे.

पणन विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळच्या सत्रात पाच बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली असून बहुतांश ठिकाणी पिवळा सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाला होता. कोणत्या बाजार समितीत किती दर मिळतोय जाणून घेऊया..

Web Title: Inflows slow in Marathwada, sale of soybeans higher in Vidarbha, prices are getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.