Join us

गव्हाला हमीभाव मिळतोय की नाही? राज्यातील बाजारसमितीत काय आहे स्थिती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 10, 2024 1:25 PM

शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहू बाजासपेठेत विक्रीसाठी येत आहे.

राज्यात गव्हाची काढणी सुरु असून राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये गव्हाची मोठी आवक होत आहे. मागील आठवड्यापासून गव्हाला साधारण २००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

काल राज्यभरात १९ हजार ३१८ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहू बाजासपेठेत विक्रीसाठी आला होता.

पुणे बाजारसमितीत गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून काल क्विंटलमागे ४८०० रुपयांचा दर मिळाला. तर  सोलापूर बाजारसमितीत काल ९७१ क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली. सर्वसाधारण मिळणारा दर ३००० रुपयांच्या दरम्यान होता.

वाशिम जिल्ह्यात काल ६००० क्विंटल गव्हाची आवक झाली. कमीत कमी २२०० रुपये तर सर्वसाधारण २४३० रुपये भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत २७०० रुपये भाव मिळाला.

गव्हाचा हमीभाव काय?

रब्बी हंगामासाठी २०२४-२५ या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत १५० रुपयांनी वाढ केली आहे.  २०२३-२४ या कालावधीसाठी गव्हाचा हमीभाव २१२५ रुपये एवढा होता .हा भाव दिडशे रुपयांनी वाढून आता प्रतिक्विंटल २२७५ रुपये भाव देण्याचे जाहीर  करण्यात आले आहे.

पहा काय होता काल गव्हाला भाव..

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/03/2024
अहमदनगर46229827102443
अहमदनगर501228826002528
अहमदनगर179235026752513
अकोला1968203725622403
अकोला180209025002500
अमरावती957245027502600
बीड186220029002550
बीड38200028512400
बुलढाणा79210025252338
छत्रपती संभाजीनगर13220032002700
छत्रपती संभाजीनगर29210028902495
छत्रपती संभाजीनगर56208124902364
छत्रपती संभाजीनगर63256128942651
धुळे1268193128002650
हिंगोली107225024002325
हिंगोली181155026902120
जळगाव200233024802421
जळगाव2551217026562613
जळगाव160250029302730
जळगाव10255025502550
जालना385227527992400
जालना100225024102310
जालना30236128512650
नागपूर500227025222459
नागपूर399227025222459
नांदेड2202520252025
नाशिक196241628002550
नाशिक95200030552861
नाशिक269253827512658
पुणे422440052004800
सांगली560300037003350
सातारा25230025002400
सोलापूर67250032003000
सोलापूर971242039752980
वर्धा238190024602215
वाशिम6000220026502430
यवतमाळ160170026152300
यवतमाळ45220022002200
यवतमाळ120220025002400
टॅग्स :गहूबाजार