सोलापूर : दिवाळीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. बुधवारी ५२४ ट्रक दर कांद्याची आवक होती.
चांगल्या मालाला दर सात हजार प्रतिक्विंटल मिळत आहे. सरासरी दर मात्र कमीच आहे. सोलापूर बाजार समितीत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यानंतर नवीन कांदा बाजारात येतो.
डिसेंबर, जानेवारी महिन्यात जवळपास ८०० ते ९०० ट्रक कांद्याची आवक असते. सध्या नवीन कांद्यालाही चांगला दर मिळत आहे.
सरासरी दर २२०० रुपये असला, तरी चांगल्या वाळलेल्या कांद्याचा दर चांगला आहे. ४००० ते ५००० हजारांपर्यंत दर मिळत आहे.
आता सध्या दररोज कांद्याची आवक वाढत आहे. शेतकरी कच्चा माल विक्रीसाठी आणू नये, कच्चा माल आल्यास दरात घसरण होत आहे.
अधिक वाचा: Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर