Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : Big increase in the price of old onion How is the price getting? | Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर

घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हे दर सुमारे महिनाभर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व विक्रेत्यांनी सोमवारी वर्तविला.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला ५५ ते ६५ रुपये दर मिळत आहे. तर नवीन कांद्याला ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. बाजारात १० ते १५ ट्रक जुन्या कांद्याची, तर ३० ते ३५ ट्रक नवीन कांद्याची आवक होत आहे.

नवीन कांद्याची आवक श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथून होत आहे. तर जुन्या कांद्याची आवक जुन्नर, मंचर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातून होत आहे. जोपर्यंत चांगल्या प्रतीच्या नवीन कांद्याची बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत हे दर स्थिर राहतील.

आवक वाढल्यानंतर जुन्या कांद्याच्या दरात घट होईल, अशी माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. पोमण म्हणाले की, मागील काही दिवसांपासून बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र, त्याचा दर्जा खालावलेला आहे.

डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चांगल्या प्रतीचा नवीन कांदा बाजारात दाखल होईल. आवकेतही मोठी वाढ होईल. त्यानंतर मात्र जुन्या कांद्याच्या दरात घट होईल. आणि तोपर्यंत जुना कांदाही बऱ्यापैकी संपलेला असेल.

सद्यःस्थितीतही शेतकऱ्यांच्या वखारीत असलेल्या जुन्या कांद्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळेच दरात वाढ झाली आहे. नवीन लाल हळवी कांद्याचा हंगाम मार्चपर्यंत असतो. त्यानंतर मात्र गरवी कांद्याचा हंगाम सुरू होतो, असेही रितेश पोमण यांनी नमूद केले.

पुणे विभागातील कांद्याला दक्षिण भारतातून कायम मागणी असते. सद्यःस्थितीतही दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून कांद्याला मागणी होत आहे. दक्षिण भारतासह पुणे शहा आणि परिसरातूनही कांद्याला मागणी आहे. मध्य प्रदेशात मात्र लोकलचा कांदा असल्याने तेथून मागणी थांबली आहे. बाजारात दाखल होणाऱ्या जुन्या कांद्याचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात वाढ झाली आहे. - रितोश पोमण, व्यापारी, मार्केट यार्ड

Web Title: Kanda Bajar Bhav : Big increase in the price of old onion How is the price getting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.