Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : Demand for Golti type onion from other state How is the get price in Srirampur market committee? | Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर

श्रीरामपूर येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली.

श्रीरामपूर येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीरामपूर : येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली.

मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ३८ वाहनांतून कांद्याची आवक आली होती. गोणीतील प्रथम श्रेणीच्या कांद्यास ४२०० ते ४६००, द्वितीय श्रेणीच्या कांद्यास ३५०० ते ४१५०, तृतीय श्रेणीच्या कांद्यास २४०० ते ३४५०, गोल्टी कांदा ३५०० ते ४४०० व खाद कांदा ७०० ते २३५० रुपये प्रतिक्विंटल लिलावात विक्री झाली.

मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये प्रथम श्रेणीचा कांदा ४२०० ते ४५००
द्वितीय श्रेणीचा कांदा ३८०० ते ४१५०
तृतीय श्रेणीचा कांदा २७०० ते ३७५०
गोल्टी कांदा ३६०० ते ४२००
खाद कांदा ७०० ते २६५० रुपये प्रतिक्विंटल विकला.

दीपावली सणामुळे २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान भुसार व कांदा मार्केटमधील लिलाव बंद राहणार आहेत.

खाद व गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी असून, कांदा व्यापारी खरेदी केलेला कांदा कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र व तामिळनाडू राज्यात विक्री करीत आहेत.

Web Title: Kanda Bajar Bhav : Demand for Golti type onion from other state How is the get price in Srirampur market committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.