श्रीरामपूर : येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली.
मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ३८ वाहनांतून कांद्याची आवक आली होती. गोणीतील प्रथम श्रेणीच्या कांद्यास ४२०० ते ४६००, द्वितीय श्रेणीच्या कांद्यास ३५०० ते ४१५०, तृतीय श्रेणीच्या कांद्यास २४०० ते ३४५०, गोल्टी कांदा ३५०० ते ४४०० व खाद कांदा ७०० ते २३५० रुपये प्रतिक्विंटल लिलावात विक्री झाली.
मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये प्रथम श्रेणीचा कांदा ४२०० ते ४५००द्वितीय श्रेणीचा कांदा ३८०० ते ४१५०तृतीय श्रेणीचा कांदा २७०० ते ३७५०गोल्टी कांदा ३६०० ते ४२००खाद कांदा ७०० ते २६५० रुपये प्रतिक्विंटल विकला.
दीपावली सणामुळे २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान भुसार व कांदा मार्केटमधील लिलाव बंद राहणार आहेत.
खाद व गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी असून, कांदा व्यापारी खरेदी केलेला कांदा कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र व तामिळनाडू राज्यात विक्री करीत आहेत.