एकीकडे पाऊस अन् दुसरीकडे घटलेला दर अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला गेल्यामुळे कांदा पिकाचे गणित जुळवणे यंदा जिकीरीचे होऊन बसले आहे.
अनेक ठिकाणी वादळासह गारपीट, अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, केळी, कांदा पिकांची मोठी नासाडी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे अनेकांचा कांदा भिजला. तसेच कांदा साठवणूक करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विकल्याशिवाय पर्याय नाही.
श्रीरामपूर येथील बाजार समितीत बुधवारी २१४० कांदा गोणीची आवक झाली. मोकळा कांदा पद्धती लिलावामध्ये ५४ वाहनांतून आवक आली होती.
कांदा गोणी लिलावात सर्वोत्कृष्ट कांद्याच्या वक्कलास १६०० तर मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये उच्च प्रतीच्या कांद्यास १२१० रुपये भाव मिळाला.
कांद्याची आवक वाढती आहे. मात्र भाव स्थिर आहेत. तेजी नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भाव वाढण्याचे चिंतेत आहेत.
मिळणारे बाजारभाव हे कांदा उत्पादन खर्चाची तोंडमिळवणी देखील होत नाही. केंद्र व राज्य शासनाने कांदा निर्यात धोरणात बदल करून हमीभावाने कांदा खरेदी करावा, अशी मागणी होत आहे.
अधिक वाचा: सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीचा भाव वाढला; कसा मिळतोय दर?