मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. गुरुवारी दहा किलो कांदा ४८० रुपये या भावाने विकला गेला आहे.
या अगोदर हाच भाव ५०० रुपयांच्या पुढे होता. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला काहीसा कमी भाव मिळाला आहे.
गुरुवारी १४ हजार ५७४ पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४८० रुपये या भावाने विकला गेला आहे.
कर्नाटक व इतर राज्यात नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे तसेच बाजारपेठेत जुन्यापेक्षा नवीन कांद्याला मागणी जास्त असल्याने बाजारभाव कमी झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
सुपर लॉट १ नंबर १३६ पिशवी गोळ्या कांद्यास ४६० ते ४८० रुपये.
सुपर गोळे कांदे १ नंबर ४३० ते ४५१ रुपये.
सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ४०० ते ४३० रुपये.
गोल्टी कांद्यास २५० ते ३७० रुपये.
बदला कांद्यास १०० ते २२० रुपये असा बाजारभाव मिळाला.
कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी व्यक्त केली आहे.