चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, दोडका, कांदा आणि काकडीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पालेभाज्यांची आवकही वाढल्याने भाव कोसळले.
जनावरांच्या बाजारात म्हैस व जर्सी गाय यांच्या संख्येत घट झाली. जनावरांचे बाजार गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी ५ लाख रुपये इतकी झाल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,०५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५० क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव ४,५०० रुपयांवरच स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव ३,५०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव २८,००० रुपयांवरच स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २४० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कांदाएकूण आवक - १,०५० क्विंटल.भाव क्रमांक १) ४,५०० रुपये.भाव क्रमांक २) ३,२०० रुपये.भाव क्रमांक ३) २,००० रुपये.
बटाटाएकूण आवक - २,००० क्विंटल.भाव क्रमांक १) ३,५०० रुपये.भाव क्रमांक २) २,८५० रुपये.भाव क्रमांक ३) २,२०० रुपये.