कोल्हापूर : कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून कांद्याला तेजी आहे. बाजार समितीत रोज सरासरी ११ हजार पिशव्यांची आवक होते. एकदम हलक्या कांद्याला प्रतिक्विंटल १५००, तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५ हजारापेक्षा अधिक दर मिळत आहे.
गेल्या चार दिवसांत बाजार समितीमधील कांद्याची आवक व दर
तारीख | आवक पिशव्या | दर प्रतिकिलो (रु.) |
२६ ऑक्टोबर | १३,९८४ | १५ ते ५५ |
२८ ऑक्टोबर | ११,१५० | १५ ते ५१ |
२९ ऑक्टोबर | ११,७४६ | १० ते ५२ |
३० ऑक्टोबर | १०,५०० | ११ ते ५४ |
अधिक वाचा: Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर