Join us

Kanda Bajar Bhav : दिवाळीच्या मुहूर्तावर मंचर बाजार समितीत कांद्याला कसा मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 11:19 AM

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ५०० रुपये या भावाने विकला गेला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलो ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ५०० रुपये या भावाने विकला गेला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलो ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

सहा हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा १० किलोला ५०० या भावाने विकला गेला आहे. शेतकऱ्यांकडील कांदा आवक कमी झाल्यामुळे आणि कर्नाटक व इतर राज्यात नवीन कांद्याची आवक वाढली आहे. 

तसेच बाजारपेठेत जुन्या कांद्यापेक्षा नवीन कांद्याला मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणेसुपर लॉट १ नंबर ११७ पिशवीगोळ्या कांद्यास रुपये ४८० ते ५०० रुपयेसुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ४५० ते ४७० रुपयेसुपर मीडियम २ नंबर कांद्यास ४२० ते ४५० रुपयेगोल्टी कांद्यास २८० ते ३८० रुपयेबदला कांद्यास १३० ते ३०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचर