चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक आणि भावही घसरले आहेत. कांद्याची आवक वाढूनही भाव चढेच आहेत.
मात्र, पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले. जनावरांच्या बाजारात जनावरांची संख्या घटली आहे. रविवारी बाजारपेठेची एकूण उलाढाल ४ कोटी ३० लाख रुपयांपर्यंत गेली आहे.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला.
बटाट्याची आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २७५ क्विंटलने वाढूनही बटाट्याचा कमाल भाव ३,१०० रुपयांवरून ३,५०० रुपयांवर पोहोचला.
लसणाची २८, भुईमूग शेंगांची आवक २४ क्विंटल झाली. भुईमुगास ५,५०० भाव मिळाला. लसणाला कमाल भाव २,८००, हिरव्या मिरचीची आवक ३३५ आणि भाव ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
जनावरांच्या बाजारात जनावरांची संख्या घटली आहे, रविवारी बाजारपेठेची एकूण उलाढाल ४ कोटी ३० लाख रुपयांपर्यंत गेली आहे.
कांदा, बटाटा आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा
एकूण आवक - १,५०० क्विंटल.
भाव क्रमांक एक ५,००० रुपये.
भाव क्रमांक दोन ३,५०० रुपये.
भाव क्रमांक तीन २,००० रुपये.
बटाटा
एकूण आवक - २,५०० क्विंटल.
भाव क्रमांक एक ३,५०० रुपये.
भाव क्रमांक दोन ३,००० रुपये.
भाव क्रमांक तीन २,५०० रुपये.