Join us

Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवकही वाढली भावही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 9:17 AM

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि.९) झालेल्या लिलावात गावरान कांद्याच्या एक-दोन वक्कलसाठी सहा हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला.

घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि.९) झालेल्या लिलावात गावरान कांद्याच्या एक-दोन वक्कलसाठी सहा हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला.

सरासरी पाच हजार सहाशे ते सहा हजार दोनशे रुपये भाव मिळाला. नवीन लाल कांद्याच्या एक अर्ध्या वक्क्लसाठी पाच हजार पाचशे तर सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपये भाव मिळाला.

घोडेगाव उपबाजारात मागील आठवड्याच्या तुलनेने गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक घटली असून, लाल कांद्याची आवक वाढली आहे.

शनिवारी बाजार समितीत एकूण २३ हजार ३३७ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यापैकी ३ हजार ६३७ गावरान कांदा गोण्यांची आवक आली होती, तर १९ हजार ४०७ लाल कांदा गोण्यांची आवक आली होती.

यावेळी झालेल्या लिलावात गावरान कांदा एक-दोन लॉट प्रतिक्विंटल सहा हजार सहाशे रुपये तर मोठा कांदा ६१०० ते ६३००, मुक्कल भारी ५३०० ते ५९००, गोल्टी ५००० ते ५२००, जोड कांदा २५०० ते ४००० रुपये असा भाव मिळाला.

लाल नवीन कांद्याच्या सुपर मालाला चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपये सरासरी भाव मिळाला, असे कांदा अडतदार किशोर झरेकर यांनी सांगितले.

बाहेर कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच यावर्षी लाल कांद्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली. तसेच आणखी नवीन लाल कांदा बाजारात येण्यासाठी एक महिना अवधी आहे. त्यातच गावरान कांद्याची बाजारातील आवक घटल्याने कांदा दारात वाढ झाली आहे. - रवींद्र राशीनकर, कांदा अडतदार, घोडेगाव.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनेवासा