तिसगाव : तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रविवारी झालेल्या लिलाव बोली प्रक्रियेत एक नंबर कांदा दराला उच्चांकी साडेपाच हजारांचा दर मिळाला. उपबाजार समिती आवारात पंधराशे चाळीस गोण्यांची विक्रमी आवक झाली.
तरीही प्रतवारी दोन नंबर कांदा तीन ते चार हजार तीन नंबर कांदा दोन ते तीन हजार रुपयांवर स्थिर राहिला. चार नंबर कांदा एक ते दोन हजार रुपये क्विंटल दराने तेजीत राहिला, अशी माहिती सभापती सुभाष बर्डे, सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक मतदान व निकालाच्या पार्श्वभूमीवर कसे होतील आजचे लिलाव या उद्देशाने बाजूच्या खेडी, वाडीवस्तीवरून इतर खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी उपबाजार समिती आवारात गर्दी केली होती.
दरात तेजी असल्याने काहींनी उशिराने कांदा विक्रीसाठी आणला उपबाजार समिती आवारातच ऊस कडवळ, मका, उसाचे वाढे ही चाऱ्यांची पिके विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे उपबाजार आवार नोव्हेंबर सरतीलाच गजबजून गेल्याचे दृष्टिक्षेपात येत आहे.