अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला ३६०० ते ४६०० रुपये, तर गावरान कांद्याला ४८०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शनिवारी लिलावासाठी ३०८६ क्विंटल गावरान कांदा, तर ४८ हजार ३६१ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.
प्रतनिहाय कांदाबाजारभाव (गावरान)
प्रथम प्रतीच्या गावरान कांद्याला ४८०० ते ५८००
द्वितीय प्रतीला ३६०० ते ४८००
तृतीय प्रतीला २७०० ते ३६००
तर चतुर्थ प्रतीला १५०० ते २७०० भाव मिळाला.
प्रतनिहाय कांदा बाजारभाव (लाल)
प्रथम प्रतीला ३६०० ते ४६००
द्वितीय प्रतीला २५०० ते ३६००
तृतीय प्रतीला १४०० ते २५००,
तर चतुर्थ प्रतीला ५०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर