चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात घसरण झाली.
पालेभाज्यांचे आवक कमी होऊनही भाव गडगडले. टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरची आवक वाढल्याने भाव वधारले. बाजारात जनावरांची संख्या घटली. एकूण उलाढाल ४ कोटी ८० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढल्याने कांद्याचा कमाल भाव ५ हजार रुपयांवरून ४ हजार ५०० रुपयांवर आला.
बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने कमी झाल्याने बटाट्याचा कमाल भाव ३,५०० रुपयांवरून ३,३०० रुपयांवर आला.
लसणाची एकूण आवक २८ क्विंटल झाली. भुईमूग शेंगांची २४ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना ५,५०० भाव मिळाला. लसणाची ३० क्विंटल आवक झाली.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे■ कांदा- एकूण आवक १,००० क्विंटल.भाव क्रमांक - १. ४,५०० रुपये.भाव क्रमांक २. ३,३५० रुपये.भाव क्रमांक ३. २,००० रुपये.■ बटाटा - एकूण आवक-२,००० क्विंटल.भाव क्रमांक १. ३,२०० रुपये.भाव क्रमांक २. २५०० रुपये.भाव क्रमांक ३. २,००० रुपये.