श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. २) मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १९ साधनातून आवक आली होती. सर्वाधिक भाव ३८७५ रुपये उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला.
प्रथम श्रेणीचा कांदा ३६०० ते ३८७५, द्वितीय श्रेणीचा कांदा २८५० ते ३५७५, तृतीय श्रेणीचा कांदा २३५० ते २७५०, गोल्टी कांदा ३१५० ते ३५५० व खाद कांदा २३०० ते २३४० रुपये प्रती क्विंटलने लिलावात विक्री झाला.
अमावस्या असल्यामुळे कांद्याची आवक घटली व बाजारभावही मंदी राहिले. मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव पद्धतीस शेतकऱ्यांकडून प्रतिसाद चांगला असून सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस कांद्याचे लिलाव होत असल्याचे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले.
अहमदनगर कांदा मार्केट अपडेट अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या गावरान कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० ते ४१०० रुपये भाव मिळाला. यावेळी २५ हजार ६२९ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली. दुसरीकडे ३५२९ क्विंटल लाल कांदाही लिलावासाठी दाखल झाला होता. त्याला ३००० ते ३५०० रुपये भाव मिळाला.