Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढली कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 10:43 AM

मागील आठवड्यात निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांचा दर होता.

सोलापूर : मागील आठवड्यात निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांचा दर होता.

सोमवारी आवक वाढल्याने दर साडेचार हजारांपर्यंत खाली कोसळला आहे. सरासरी दर ३२०० रुपयांपर्यंतच मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचा वादा होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आता कांद्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी १८३ ट्रक कांद्याची आवक होती आणि दर साडेपाच हजार रुपये क्विंटल होता.

शनिवारी २५५ ट्रक आवक आणि दर ४९०० रुपयांपर्यंत होता. सोमवारी आवक आणखी वाढली आहे. लाल कांदा २६० ट्रक आणि पांढरा कांदा २३ ट्रक असे २८३ ट्रक आवक होती. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे.

चांगल्या कांद्याला ४५ हजारांचा दर मिळाला आहे. तर सरासरी दर केवळ ३२०० रुपये होता. पांढरा कांद्याचा दर लाल कांद्यापेक्षा अधिक होता. मात्र, अचानक पांढऱ्या कांद्याचा दर ३५०० रुपयांपर्यंत खाली आलेला आहे.

सरासरी दर २८०० रुपये आहे. आता आवक वाढायला सुरुवात झालेली आहे. सोमवारी अचानक दर कोसळल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

कर्नाटकातून मोठी आवककर्नाटकातील बागलकोट, विजयपूर, बुद्देबिहाळ, इंडी या भागातून आवक सुरू आहे. रविवारी रात्री विजयपूर रोडवर कांद्याच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. याशिवाय सातारा जिल्ह्यातून म्हसवड, फलटण भागातूनही कांदा येत आहे. माळशिरस तालुक्यातून आवक सुरू आहे.

५० टक्के नवीन मालमागील आठवड्यापर्यंत पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून जुना कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये येत होता. जुन्या कांद्याला दर चांगला मिळत होता. आता मार्केटमध्ये पन्नास टक्के नवीन माल येत आहे. नवीन कांद्याला दर कमी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

आता नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढणार आहे. दिवाळीनंतर मोठी आवक असेल. राज्यात सर्वत्र दर कोसळला आहे. त्यामुळे सोलापुरात सोमवारी दरात घसरण झाली आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग, सोलापूर

टॅग्स :कांदाबाजारशेतकरीशेतीसोलापूरमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती