मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ४५० रुपये या भावाने विकला गेला. याअगोदर हाच भाव ५०० रुपयांच्या पुढे होता.
गुरुवारी १० किलोला ४५० रुपये असा बाजारभाव मिळाला. सहा हजार ८०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा १० किलोला ४५० या भावाने विकला गेला आहे.
शेतकऱ्याकडील कांदा आवक कमी झाल्यामुळे आणि कर्नाटक व इतर राज्यात नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी आहे.
तो कांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
दर पुढीलप्रमाणे
सुपर लॉट १ नंबर गोळे कांद्यास रुपये ४५० ते ४७० रुपये.
सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ४३० ते ४४० रुपये.
सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ३८० ते ४२० रुपये.
गोल्टी कांद्यास २८० ते ३५० रुपये.
बदला कांद्यास १०० ते २२० रुपये असा बाजारभाव मिळाला.